कृषी

वडाळा बहिरोबा येथे कृषिदूतांचे आगमन

नेवासा : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रविण बोरुडे, प्रथमेश जामकर, शिवसागर दोडके, प्रज्वल काकडे, वैभव चापे, अनिकेत चव्हाण या कृषी दुतांचे नेवासा तालुक्यातील वडाळा बहीरोबा येथे आगमन झाले. गावाचे सरपंच ललित मोटे, उपसरपंच सचिन मोटे, प्रकश तवले, ज्ञानेश्वर पतंगे यांनी कृषितांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. पी. ए. तूरभटमट, कार्यक्रम समन्वयक एम. आर. माने, प्रा. महाजन सर, प्राध्यापिका खखाले मॅडम, प्रा. सागर साबळे, प्रा. सागर सोनटक्के आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांच्या कालावधीत कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम गावातील पीक पद्धती, आधुनिक शेती माहिती, बळीराजाला वित्तीय पुरवठा, सहकारी विन संस्थांची कार्यक्रम पद्धती, पीक प्रात्यक्षिके, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, किडरोग नियंत्रण इतर शेतीबाबत माहिती देणार आहे. शेतकऱ्यांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषीदूतांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button