अहमदनगर

खासदारांच्या कार्यालयासमोर पेन्शन धारकांचे लाक्षणिक उपोषण

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व इपीएस ९५ पेन्शन धारकांचे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने व राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या निर्देशानुसार व पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या प्रश्नासाठी राज्यातील सर्व खासदारांच्या कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

दि १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून नगर जिल्ह्यातील सर्व पेन्शन धारकांनी खा. सुजय विखे यांच्या अहमदनगर येथील पोलिटेक्निक कॉलेज आनंद ऋषी हॉस्पिटल मार्ग वरील जनसंपर्क कार्यालयासमोर, दि १९ जुलै रोजी खा. सदाशिव लोखंडे यांचे शिर्डी येथील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारोच्या संख्येने पेन्शन धारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, भगवंत वाळके आदी पदाधिकारी यांनी केले आहे.

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दि. २० जुलै पासून चालू होत असून पेन्शनवाढी संदर्भात दोन्ही खासदारांनी अधिवेशनात ठोस भूमिका मांडावी त्यासाठी आग्रह करणार असल्याचे शहराध्यक्ष संजय मुनोत, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, तालुकाध्यक्ष सुखदेव आहेर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी श्रीरामपूर येथे बैठकीत सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button