कृषी

शेतकर्‍यांनी आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा वापर करावा – अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे

आय. व्ही. एफ तंत्रज्ञानातून झाला सहाव्या गिर कालवडीचा जन्म

राहुरी विद्यापीठ : आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानांचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा घेऊन आपल्या गोठ्यामध्ये उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण कराव्यात असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी केले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे कार्यरत आहे. या केंद्रामार्फत उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या संवर्धनासाठी आय.व्ही.एफ. / भृण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठाचे प्रक्षेत्र व शेतकर्‍यांच्या गोठ्यात राबविण्याचे काम सुरु आहे.

राहुरीच्या गो संशोधन प्रकल्पावर या तंत्रज्ञानाने आजपर्यंत 6 गिर व 9 साहिवाल या देशी जातीच्या उच्च वंशावळीच्या कालवडी जन्माला आलेल्या आहेत. नुकत्याच जन्मलेल्या सहाव्या गिर कालवडीची पाहणी करताना अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे बोलत होते.

देशी गाय संशोधन केंद्राद्वारे आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाने शेतकर्‍यांच्या गोठ्यात 150 देशी कालवडी निर्माण करण्याचे उद्यिष्ट असुन देशी गाय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने, भृण प्रत्यारोपणाचे समन्वयक डॉ. विष्णू नरवडे व त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या गोठ्यात सदरचा कार्यक्रम राबविण्याचे काम करत आहे.

या प्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, डॉ. विष्णू नरवडे, अमर लोखंडे व कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button