अहमदनगर

बेलापूर येथे ‘स्टेट बँक आपल्या दारी’ उपक्रमाचा गौरव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सुमित फोटो जानकी एजन्सी व संजीवनी विकास फौंडेशन यांच्या सौजन्याने ‘स्टेट बँक आपल्या दारी’ उपक्रम बेलापूर खुर्द येथे राबवण्यात आला. नवनाथ शेलार यांनी साकारलेल्या कल्पनेचा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या फिरते ग्राहक सेवा केंद्र चा बँक अधिकाऱ्यांकडून गौरव झाला.

या शिबिरात ग्राहक सेवा संचालक शेलार यांनी नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जनधन खाते आदी सरकारी योजनांचे महत्त्व व जनजागृती केली. यावेळी कॅम्पला अहमदनगर क्षेत्रीय कार्यालय ऑफिसर स्नेहल कुलकर्णी, संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर जिल्हा समन्वयक अमोल जवणे, साक्षी जवणे आदींनी भेट दिली. यावेळी जयहो सामाजिक संस्था व ग्रामपंचायत कार्यालय बेलापूर खुर्द यांनी मोलाचे सहकार्य केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button