अहमदनगर

हरेगांव येथे श्रीरामपूर बंदला पाठिंबा

श्रीरामपूर : शिर्डी येथे होणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय रद्द करून श्रीरामपूर येथेच व्हावे व श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीसाठी आज सर्वपक्षीय श्रीरामपूर बंदला पाठिंबा देण्यासाठी हरेगांव येथील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्यात आली.

श्रीरामपूर येथे जिल्ह्यासाठी लागणारी सर्व कार्यालये अगोदरच कार्यरत असल्याने शिर्डी येथे होणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय रद्द करून श्रीरामपूर येथेच व्हावे व श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी हरेगाव सर्व व्यापारी व ग्रामस्थ यांनी उस्फुर्त बंद पाळला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील शिनगारे यांनी दिली व श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने फेरविचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button