ठळक बातम्या

पेन्शन धारकांच्या शिष्टमंडळाने घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येत्या दोन दिवसांत पेन्शनरांच्या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर समक्ष चर्चा करणार आहोत असे आश्वासन पेन्शन धारकांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.

इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीच्या प्रश्न म्हणावा तसा सुटलेला नसल्याने राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांनी प्रतिनिधी मंडळाबरोबर दिल्ली येथे गृहमंत्री यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रतिनिधी मंडळात राष्ट्रीय महासचिव विरेन्द्रसिंह राजावत, राष्ट्रीय सचिव रमेश बहुगुणा, मुख्य समन्वयक उत्तर प्रदेश राजीब भटनागर, उत्तर महाराष्ट्र समन्वयक संजय पाटील हे होते.

संरक्षणमंत्री यांना कमांडर राउत यांनी २० एप्रिल रोजी किमान पेन्शन वाढीबाबत संसद यांची समितीमध्ये झालेला विषय व राष्ट्रीय संघर्ष समितीने दिलेले विवेचन समितीचे चेअरमन व सदस्य यांची सविस्तर माहिती दिली. या प्रतिनिधी मंडळाने अतिरिक्त बजेट विना भविष्य निर्वाह निधी कार्यालय आपल्या फंडातून मिनिमम पेन्शन वाढ करू शकते. केंद्रीय चुनाव समितीचे सदस्य या नात्याने संरक्षण मंत्री यांना निवेदन दिले.

यावेळी लखनौ येथे भेट झाल्याची आठवण दिली. व त्यावेळी कामगारमंत्री यांना पण याबाबत लक्ष घालण्याचे सांगितले होते. लवकरच पंतप्रधान यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिष्टमंडळास दिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button