ठळक बातम्या

कामाचा दर्जा सुधारून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा- स्वराज्य संघटनेची बांधकाम विभागाकडे मागणी

संगमनेर शहर : तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी एक स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीकडे जाणारा निमगाव ते पेमगिरी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असल्याने व निमगाव खु ते सावरचोळ या रस्त्याचे रूंदीकरण काम निकृष्ट दर्जाचे चालू असल्याने स्वराज्य संघटनेचे निमंत्रक इंजि. आशिष कानवडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, खांडगाव ते कोठे फाटा या रस्त्याचे काम पूर्ण झाले असुन निमगाव बु ते पेमगिरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात आता पावसाळा जवळ आला आहे. पेमगिरी पर्यटन स्थळ असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात व त्यांना रस्त्याचा मनस्ताप होत असतो. या रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी साईड गटार काढण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

तसेच सध्या सुरू असलेल्या निमगाव खु ते सावरचोळ रस्ता रुंदीकरण काम निकृष्ट दर्जाचे होत असुन एका नामांकित राजकीय वरदहस्त असलेल्या कंपनीने हे काम घेतले असल्याने कोणी आवाज उठवत नसल्याची चर्चा तालुक्यात आहे. परंतु स्वराज्य संघटनेच्या वतीने निकृष्ठ दर्जाचे काम त्वरित थांबवावे, अन्यथा सर्व पक्षीय जनआंदोलन उभे करून रस्ता रोको करण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे.

निकृष्ट दर्जाचे काम थांबविण्यात यावे, या मागणीचे निवेदन देताना स्वराज्य संघटनेचे निमंत्रक आशिष कानवडे, संदिप राऊत, शिवसेनेचे संकेत कोल्हे, सुरेश डुबे, प्रवीण गुळवे, चैतन्य डुबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button