अहमदनगर

प्रा. गोसावी यांचा क्रांतीसेनेतर्फे सत्कार

राहुरी : येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्यपदी प्रा. डॉ. राजेंद्र गोसावी यांची निवड झाल्याबद्दल क्रांतीसेनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सलग्न असणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रिक्त झालेल्या प्राचार्य पदाच्या जागेवर प्राध्यापक डॉ. राजेंद्र गोसावी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाल्याने अखिल भारतीय क्रांतीसेना व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्रा. डॉ गोसावी हे अनेक वर्षांपासुन या महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स या विभागाचे प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. प्रा. डॉ. गोसावी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहे.

प्रा. डॉ. गोसावी यांचा सत्कार करताना क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य अविनाश भिंगारदे, राहुरी युवा तालुकाध्यक्ष शाम कदम, मेजर अभिजित सप्रे, विठ्ठल लांबे, किरण भोंगळ, रोहित म्हसे पाटील, संतोष महेत्रे, किरण शिंदे, अभि कर्डक, किरण भांड आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button