ठळक बातम्या

विद्यापीठ अभियंता ढोके यांच्यावर कार्यवाही करा; खंडपीठाचे कुलसचिवांना आदेश

राहुरी | अशोक मंडलिक : मा. आयुक्त समीर सहाय्य यांच्यासमोर तृषांत त्रिभुवन यांच्या सहा अपिलांची सूनवणी झाली. सहापैकी चार प्रकरणांमध्ये शासन परिपत्रका अन्वये विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना खंडपीठाने दिले आहेत.

आपल्या कालावधीत झालेल्या कामांची माहिती बाहेर गेल्यास आपण केलेले गैर व्यवहार बाहेर येतील. या भीतीपोटी अनेक अर्जांना केराची टोपली दाखवून माहिती दडवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या विद्यापीठ अभियंता कार्यालयाला सहा प्रकरणांमध्ये मुद्देनिहाय विनामूल्य माहिती देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

त्याचबरोबर सहाय्यक अभियंता अंबादास जगन्नाथ भगत यांच्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देऊन एका प्रकरणात लिपिक सचिन राऊत व विद्युत शाखा अभियंता एम डी सोनवणे यांनी माहिती संकलित करण्यास सहाय्य केले नसल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत खुलासा सादर करायचा आहे. सहा प्रकरणांमध्ये विनामूल्य माहिती देण्याचे आदेश असल्याने माहिती बाहेर आल्यास बराच गैरव्यवहार बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अभियंता यांच्यावर विद्यापीठ व शासन दरबारी अनेक तक्रारी असून विद्यापीठ प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपा अशीर्वादामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button