अहमदनगर

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे विविध कार्यक्रम

जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम

नगर – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने माळीवाडा येथे मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर, प्रबोधनात्मक व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिकांचे रक्तगट, हिमोग्लोबीन तपासणी, नेत्रतपासणी करण्यात आली. मोतिबिंदू असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. पुंडे सर यांनी प्रबोधनात्मक व्याख्यान दिले व मंदाताई फुलसौंदर, कान्हू सुंबे यांनी गीत गायनातून प्रबोधन केले. बाल सावित्रीच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकलीने महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला.

दिवसभर चाललेल्या या सामाजिक उपक्रमास आमदार संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर, महापौर रोहिणीताई शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, किशोर डागवाले, प्रा. सुनिल जाधव, मंगलताई भुजबळ, अ‍ॅड. धनंजय जाधव, नगरसेवक प्रकाश भागानगरे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, अनुराधा झगडे,श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड, दत्ता जाधव, प्रा. माणिक विधाते, अ‍ॅड. अनिता दिघे, नगरसेवक महेंद्र गंधे, अ‍ॅड. अभय आगरकर, अ‍ॅड. सुनिल तोडकर, अनिल साळवे, सचिन साळवी, डॉ. संतोष गिर्‍हे, विष्णुपंत म्हस्के, अश्‍विनी वाघ, जयेश शिंदे, स्वाती डोमकावळे, आरती शिंदे, पोपट बनकर, विनोद साळवे, दत्ता वामन, राम कराळे, अनंत द्रवीड, मुख्य संयोजक अ‍ॅड. महेश शिंदे, जयश्री शिंदे आदि उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button