ठळक बातम्या

कसबा पोटनिवडणुकीच्या विजयाचा सूत्रधार राहुरीचा युवराज

बाळकृष्ण भोसले | राहुरी : संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाच्या राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठेत २८ वर्षांत पहिल्यांदाच परिवर्तन झाले व काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले.
शहरात अनेक चाणक्यनितीकार होते, आहेत पुढेही होत राहतील. मोठमोठ्या राजकीय पक्षांना विजयाची गणित सांगण्यासाठी व प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. त्यातून कधी यश येत, कधी पराभवाला सामोर जावं लागत. पण ‘राज’ ‘नीती’ त्या पक्षाच्या नेत्यांना अवगत करण्यासाठी व त्यावर वाटचाल करण्यासाठी या आजच्या सामाजिक माध्यमाच्या युगात मोठी गरज निर्माण झाली आहे. शहरात राजकीय गणित मांडणारे बहुसंख्य मिळतील पण ग्रामीण भागही आता राजकीय चाणक्यनितीकार नक्कीच सद्यस्थितीत मागे नाहीत हे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील युवक युवराज चव्हाणने सिध्द केले.
कसबा पोटनिवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा सामाजिक माध्यम, प्रसार माध्यम व निवडणूक व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी येथील युवराज विलास चव्हाण या युवकाने सांभाळली. गेल्या दोन वर्षापासून युवराज चव्हाण या युवकाने सातत्याने कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये रवींद्र धंगेकर यांच्यासाठी मतदार संघ बांधणीचे काम सुरू केले होते.
भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीपासून तर राज्यातल्या सर्व मोठ्या नेत्यांनी भलीमोठी राजकीय ताकद लावून देखील या मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला नाही. युवराज चव्हाण यांच्या ‘टीम व्हि मीडिया & इलेक्शन मॅनेजमेंट’ या कंपनीने यापुर्वी मा.राज्यमंत्री प्राजक्तादादा तनपुरे, रूपालीताई चाकणकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर प्रशांत जगताप यांसह अनेक नेत्यांसाठी निवडणूक व्यवस्थापनाचे काम केले आहे.
    कसबा पोटनिवडणुकीत प्रचार व प्रसार माध्यम याबरोबरच डिजिटल माध्यमाचा सुयोग्य वापर करत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे कसब आमच्या टिमने वापरले. त्याचा परिणाम दिसून आला. यापूर्वी राहुरीत आम्ही या तंत्राचा वापर केला त्याला अपेक्षित यश मिळाले होते नि प्राजक्त तनपुरे विजयी झाले होते. 
  _ युवराज चव्हाण, टिम व्ही मिडिया & इलेक्शन मॅनेजमेंट

Related Articles

Back to top button