अहमदनगर

महिलांना आनंदाने जीवन जगता आले पाहिजे – प्रा. डॉ. वंदनाताई मुरकुटे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जीवन जगत असताना महिलांनी कुटुंबासाठी जगताना स्वतःसाठी वर्षातून एक दिवस तरी जगावे, महिलांनी स्वतःला ओळखले पाहिजे, स्वतःच्या मनाप्रमाणे एक दिवस तरी जीवन जगता आले पाहिजे असे उद्गार श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती प्रा.डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील खडकवस्ती (माळवाडगाव) येथे जागतिक महिला दिन समारंभात उपस्थित महिलांसमोर व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुका काँग्रेस पक्षाचे कायम निमंत्रित सदस्य जालिंदर आबा आसने, श्रीकांत दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शशिकला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा.डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव आसने, पत्रकार संदीप आसने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती प्रा. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या हस्ते बचत गट सीआरपी वर्षा काळे, अहमदनगर येथे पार पडलेल्या महिला बचत गट प्रदर्शनात श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल लता आढाव, कल्पना खताळ, कृषी वर्धिनी निशा ढवळे, वर्धिनी अनिता जाधव यांचा सन्मान करण्यात आला तर मुरकुटे यांचा सरिता दळे आणि केशरबाई दळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. सन्मान केल्याने अनेक महिलांना प्रेरणा मिळत असते. महिला आणि पुरुष हे समान आहेत. मात्र महिला देखील कोणत्याही गोष्टीत मागे नाहीत. महिला या संपूर्ण वर्षभर कुटुंबाची काळजी घेत असतात. वर्षभर त्या कुटुंबासाठीच जगत असतात मात्र त्यांनी कुटुंबासाठी जगत असताना वर्षातून एक दिवस तरी स्वतःसाठी जगावे असे आवाहन श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती प्रा. डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले.
गायरान जमीन प्रश्नी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू – मुरकुटे
    खडक वस्ती येथील गायरान जमिनीबाबत श्रीकांत दळे यांनी लक्ष वेधले असता शासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढले जाणार नाही. मात्र जर शासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलाच तर रस्त्यावर उतरण्याची देखील माझी तयारी असल्याचे प्रा.डॉ. मुरकुटे यांनी म्हटले आहे.
यावेळी सुमन खोसे, संगीता जगरूपे, मनीषा कापसे, पल्लवी दळे, कुसुम थोरात, ठकुबाई पवार, शितल आसने, सुवर्णा आसने, दिपाली आडसरे, सिंधुबाई आसने, कोमल थोरात, मनीषा थोरात, सीमा खोसे, मीरा दरेकर, रुक्मिणी पवार, कल्पना पवार, मंदा बर्डे, शोभा थोरात, अनिता पाचवणे, केशरबाई थोरात, शालन आसने, सविता दळे, कुसुम काळे, केशरबाई जाधव, आशा खोसे, मीना जाधव, सरिता डहाळे, वंदना जगरूपे, शिला जगरूपे, अलका लटमाळे, सारिका लटमाळे, चंद्रकला पवार, लता उबाळे, अलका खुरसने, सुमन खुरसने, मीना जाधव, रेखा गुडेकर, रेखा लोखंडे, कमल लोखंडे, पुष्पा लोखंडे, चंद्रकला ढवळे, लिलाबाई आडसरे, चंद्रकला पवार, मंदा बर्डे, आरती आसने, सोनाली काळे, कविता ढवळे, निर्मला शेलार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा ढवळे यांनी केले तर आभार अनिता जाधव यांनी मानले.

Related Articles

Back to top button