शिक्षणवारी ज्ञान पंढरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पदव्युत्तर महाविद्यालयात अमेरीकेतील टीनेसी स्टेट युनिर्व्हसीटीतील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार होते. याप्रसंगी पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, हळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, टीनेसी स्टेट युनिर्व्हसीटीचे कार्यकारी संचालक डॉ. ज्वेल विन, टीनेसी स्टेट युनिर्व्हसीटीच्या अध्यक्षांच्या कार्यकारी सहाय्यक डॉ. अर्लीन निकोलस-फिलीप्स, अलपेसा एज्युकेशन सर्व्हिसेसचे अध्यक्ष शिवशंकर बिरादार, उपाध्यक्ष विशाल दरंदले, ग्लोबल एंगेजमेंटच्या संचालिका श्रीमती रश्मी शेटकर, मार्केटींग व ऑपरेशन्स विभागाचे संचालक संगमेश्वर बिरादार उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पोस्ट डॉक्टरेटचे शिक्षण परदेशातील उत्कृष्ठ विद्यापीठांमध्ये घेण्यासाठी भारत सरकारचे धोरण उपयुक्त असल्याचे सांगितले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ व परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी सामंजस्य करार होणे गरजेचे आहे असे यावेळी ते म्हणाले. डॉ. अर्लीन निकोलस-फिलीप्स यांनी जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या उच्च संधी किती महत्वाच्या आहेत या विषयी मार्गदर्शन केले.

श्रीमती रश्मी शेटकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अमेरीकेतील टीनेसी स्टेट युनिर्व्हसीटीमधील पदवी तसेच पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरेट पदवीविषयीच्या प्रवेशासंबंधी तसेच शिक्षणानंतर संशोधन व शैक्षणीक करीयरसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देवून त्यांचे समाधान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम.आर. पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button