कृषी

व्यवसायीक पध्दतीने केलेल्या शेळीपालनातून शाश्वत उत्पादन शक्य- प्रभारी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ

राहुरी विद्यापीठ : शेतकर्यांनी विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेवून आपला शेळीपालन व्यवसाय किफायतशीर रित्या करावा व शेळी पालनातून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन व्यवसाय म्हणुन केल्यास त्यापासून शाश्वत उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वीत संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाच्या वतीने तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. 14 ते 16 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राजेंद्र वाघ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. संजय मंडकमाले, पशुसंवर्धन विभागाचे प्राध्यापक डॉ. विनू लावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. संजय मंडकमाले म्हणाले की, शेळीपालकांना नवनविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच शेळीपालनाबाबत अवास्तव ताळेबंद मांडून केल्या जाणार्या शेळीपालनाबाबत सजगता निर्माण व्हावी या हेतूने महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत सन 2015 पासून 19 प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आले असून एकुण 742 प्रशिक्षणार्थींनी त्याचा लाभ घेतला आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संजय मंडकमाले यांनी केले. या प्रशिक्षण वर्गासाठी जिल्ह्यातून आलेले 25 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button