अहमदनगर
वांबोरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी
वांबोरी : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी युवक संघ व सर्व फुले प्रेमी वांबोरी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती तसेच ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राहुरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, माजी सरपंच वन्याबापू राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश राऊत, यादव हजारे, पत्रकार संजय खरात, ज्ञानदेव तांबटकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक तुपे, श्री संत सावता माळी युवक संघ राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे, जालिंदर कांबळे, रामकिसन कुऱ्हे, प्रजोत पुंड, भैया मन्सुरी, सलमान शेख आदींसह फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.