अहमदनगर
राष्ट्रीय संघर्ष समितिच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयास निवेदन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांचे सुचनेनुसार दि. २७ जानेवारी रोजी “निधी आपके निकट” या अहमदनगर येथील कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष संजय मुनोत यांचे नेतृत्वाखाली पेन्शनर प्रतिनिधींनी सहभाग घेऊन भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयास निवेदन दिले व संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यामध्ये माधव कुलकर्णी, यशवंत फुलसुंदर, बाळू राजापुरे, चंद्रशेखर इंगोले, सकाहरी भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते.