अहमदनगर

शब्दगंध चे रविवारी पारितोषिक वितरण व काव्यसंमेलन

राहुरी | बाळकृष्ण भोसले : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी दु.२ वा.जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.महावीरसिंह चौहाण, अहमदनगर मनपाच्या नगरसेविका दिपालीताई बारस्कर, जेष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंध चे संस्थापक सुनील  गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती शब्दगंध चे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली.
यावेळी निमंत्रितांचे काव्यसंमेलन होणार असून यामध्ये मनीषा गायकवाड, बाळासाहेब मन्तोडे, जयश्री झरेकर, ऋता ठाकूर, स्वाती ठुबे, बाळासाहेब अमृते, सुरेखा घोलप भूकन, विनोद शिंदे, डॉ.सुदर्शन धस, रज्जाक शेख, कृष्णा अमृते, अजयकुमार पवार, विद्या भडके, मारुती सावंत, आत्माराम शेवाळे, अमोल आगाशे, सुनंदा नागुल, प्रतीक्षा गाढवे, प्रियंका सुंबे, बेबीताई गायकवाड, कार्तिक झेंडे, अविष्कार इकडे इत्यादी कवी सहभागी होणार असुन काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी करणार आहेत. यावेळी नगर तालुका शाखा शब्दगंध कार्यकारी मंडळाची निवड करण्यात येणार आहे.
तरी साहित्यिक व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, अजयकुमार पवार, उपाध्यक्ष शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, सहसचिव तुकाराम गोंदकर, सुनीलकुमार धस, राज्य कार्यकारणी सदस्य किशोर डोंगरे, राजेंद्र पवार, रामकिसन माने, बबनराव गिरी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button