अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठात एमपीकेव्ही क्लायमेक्स – 2022 कार्यक्रमाच्या प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 20 ते 22 डिसेंबर, 2022 दरम्यान कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठातील नाएप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पदव्युतर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी तथा अंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने, कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, डॉ सचिन नानगुडे, विद्यापीठातील इतर अधिकारी, शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते. एमपीकेव्ही क्लायमेक्स – 2022 या कार्यक्रमात कृषि उद्योजकांचे भव्य प्रदर्शन, कृषि पदविधरांचा भव्य मेळावा, कृषि पदवीधरांसाठी शिक्षण व रोजगार मेळावा, यशस्वी कृषि उद्योजकांची व्याख्याने, शेतकर्यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 या कार्यक्रमात कृषि शिक्षण देणाऱ्या संस्था, कृषि पदवीधर उद्योजक, इतर उद्योजक, सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था व शेतकरी उद्योजक यांचे या प्रदर्शनात स्टॉल राहणार आहे. यामध्ये शेतीमधील विविध निविष्ठा तसेच सेवा पुरविणार्या कंपन्यांचा समावेश असणार आहे. कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटीक्स तंत्रज्ञान, खाजगी कंपन्यांनी विकसीत केलेले तंत्रज्ञान, विविध सरकारी, निमसरकारी संस्थेच्या योजना एकाच दालनाखाली पहाण्यास मिळणार आहे.

Related Articles

Back to top button