अहमदनगर

विद्यालयाशी संपर्क ठेवून माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवावी- जगताप; शिरसगाव येथे माजी विद्यार्थी मेळाव्यास भव्य प्रतिसाद

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : विद्यार्थ्यांना ज्या विद्यालयाने वाढविले त्या विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी माजी विद्यार्थ्यांनी शक्य ती आर्थिक मदत करावी. विद्यालयाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. विद्यालयाशी संपर्क ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवावी, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक मच्छिंद्र जगताप यांनी केले.
१९९१ या वर्षी इमारत बांधकामासाठी शिक्षकांनी ७ लाखाची देणगी दिली. त्यातून विद्यालय इमारत उभी राहिली. पुढे स्व.गोविंदराव आदिक यांच्या मदतीमुळे खोल्याचे बांधकाम झाले. इतर निवृत्त शिक्षकांनी देखील भरीव मदत केली. त्यातून शाळेला विविध साहित्य खरेदी करता आले, अशी माहिती मुख्याध्यापक मच्छिंद्र जगताप यांनी खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिरसगाव ता. श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रांगणात दि. २५ डिसेंबर रोजी शाळा स्थापनेपासून सर्व शालेय जीवनपट, आठवणी उजळून निघाव्यात यासाठी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचा शुभारंभ केला.
कलाविश्वाच्या इतिहासातील सर्व विद्यार्थ्यांचा शाळा स्थापने पासून एकत्रित अविस्मरणीय माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ५०० च्या वर माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, मुख्याध्यापक कर्मचारी, सहभागी झाले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी या विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप हे होते. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सरस्वती व संस्था संस्थापक स्व.खा.गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच व्यायामशाळेचा शुभारंभ प्रथम मुख्याध्यापक मच्छिंद्र जगताप व माजी नगरसेविका शितल गवारे यांच्या हस्ते झाला. प्राचार्या सुमती औताडे यांनी प्रास्तविकात विद्यालयाच्या स्थापनेपासून आढावा सांगितला व ह्या विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून सर्वांच्या सहकार्याने विद्यालयाचा नावलौकिक वाढणार आहे इतकी प्रगती झाली आहे , असे सांगितले. उत्कृष्ट सूत्र संचालन अरविंद थोरात यांनी केले.
यावेळी सोसायटी चेअरमन किशोर पाटील, राजेंद्र गवारे, माजी मुख्याध्यापिका विमल आदिक, भास्करराव ताके, वृषाली जोंधळे, मुकुंद गवारे, सविता गोरे, संतोष मेटे, कृष्णा देवकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब कासार व म्हाळसाकांत राउत यांचा सेवानिवृत्तीमुळे सत्कार करण्यात आला. यावेळी विजय मोरे, रमेश वल्टे, जयकर मगर, सूर्यभान बोठे, सुभाष लिंगायत, भागचंद औताडे, मुरलीधर यादव, रावसाहेब आदिक, गोपीनाथ वमने, भास्करराव ताके, नितीन गवारे, दत्तात्रय वाघमोडे, साईनाथ गवारे, शशिकांत गवारे, आश्लेषा जासूद, प्रवीण गवारे, जगदीश गवारे, रमेश बोरकर, रंगनाथ माने, बहिरे, ज्योती सबनीस, नंदा सोळस आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक विजय थोरात यांनी केले.

Related Articles

Back to top button