अहमदनगर

वांबोरी येथे मोफत स्त्रीरोग शिबिर संपन्न

राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथे संत सावता महाराज युवा महिला संघटना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान व साईधाम हॉस्पिटल राहुरी यांच्या वतीने मोफत स्त्रीरोग शिबीर संत सावता महाराज मंदीर येथे संपन्न झाले.
सामाजिक कार्यकर्त्या व संत सावता महाराज युवा महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई बबनराव व्यवहारे यांच्या संकल्पनेतून व माजी सरपंच नितीन बाफना व उपसरपंच सौ.मंदाताई भिटे यांच्या सहकार्याने स्त्रीरोग, वंध्यत्व निदान व कॅन्सर रोग जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात 110 महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी साईधाम हॉस्पिटलच्या वतीने माजी सरपंच नितीन बाफना, उपसरपंच मंदाताई भिटे, जयश्रीताई व्यवहारे, प्रशांत नवले यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच नितीनशेठ बाफना, डॉ.स्वप्नील माने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर, उपसरपंच मंदाताई भिटे, जयश्रीताई व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्या मंजुषाताई देवकर, संगिताताई जवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत नवले, पत्रकार बाळासाहेब कांबळे, दिपक साखरे, मोहनराव शिंदे, डॉ.माने मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे, डॉ.प्रियंका आंधळे, अनिकेत धनेधर आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button