अहमदनगर

हरिगाव येथे ख्रिस्तराजा सोहळा उत्साहात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येशू ख्रिस्त हा विश्वाचा राजा आहे याची जाणीव आपण इतरांना दिली पाहिजे. तो राजा असून त्याने फार दुख सोसले. त्याने दुसऱ्यासाठी आपला देह समर्पित केला व दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनाव्दारे इतरांना आनंदित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण ह्या जगातून आपल्या बरोबर काहीच घेऊन जात नाही याची जाणीव प्रत्येक मनुष्याने सदैव ठेवावी असे प्रतिपादन नासिक धर्मप्रांत महागुरु स्वामी लूरडस डानियल यांनी सणानिमित्त झालेल्या मिस्सा प्रसंगी केले.
यावेळी स्थानिक धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी आदी परिसरातील धर्मगुरू, धर्मभगिनी सहभागी झाले होते. महागुरु स्वामी यांचा सत्कार सुभाष पंडित व वाय जी त्रिभुवन यांनी केला. श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव येथे संत तेरेजा चर्च येथे रविवारी ख्रिस्त राजा सोहळा उत्साहात संपन्न झाला. पहाटे ६.४५ वाजता हरिगाव डी क्वार्टर येथून गावातून संत तेरेजा चर्च पर्यंत भाविकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ख्रिस्त राजाच्या सणाच्या निमित्ताने तीन वेगवेगळ्या ठिकाणी साक्रामेंताची आराधना, भक्तिभावाने करण्यात आली.

Related Articles

Back to top button