कृषी

बुचकेवाडी येथे काटेकोर सिंचन व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षण संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील हवामान अध्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सिंचन पाणी गरज सल्ला सेवा आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाद्वारे पुरस्कृत विद्यापीठ प्रणालीद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुप्रयोग यासाठी सहाय्य प्रकल्पांतर्गत बुचकेवाडी ता. जुन्नर, जि. पुणे येथे काटेकोर सिंचन व्यवस्थापन या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण, प्रात्यक्षिक तसेच प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये इंजि. निखिल दुगड यांनी पिकाच्या पाण्याची गरज काढण्यासाठी फुले ॲपचा वापर याविषयी सविस्तर माहिती देऊन या फुले ॲपचे प्रात्यक्षिक दाखविले. इंजि. तेजश्री नवले यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन याकरिता आयओटी तंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. शुभांगी घाडगे यांनी हवामान प अद्ययावत कृषी डिजिटल गाव संकल्पना याविषयी मार्गदर्शन करून कास्ट प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. या प्रशिक्षणानंतर ऑटोपीआयएस या स्वयंचलित सिंचन प्रणालीचे प्रात्यक्षिक आणि प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी बुचकेवाडी येथील सरपंच सुहास डेरे, उपसरपंच सुरेश गायकवाड यांच्यासह शेतकरी व तरुण सहभागी झाले होते.
यावेळी या प्रशिक्षणाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून कृषी क्षेत्रातील या डिजिटल तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता दाखविली. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक तथा कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि जलसिंचन व निचरा अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील कदम यांच्या सहकार्याने या प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर इंजि. अभिषेक दातीर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Back to top button