शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची किनोमेरा बायोसायन्स कंपनीत निवड

राहुरी | बाळकृष्ण भोसले – तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात किनोमेरा बायोसायन्सेस बदलापूर, मुंबई येथील कंपनीचा कॅम्पस मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदर मुलाखतींमध्ये सात्रळ महाविद्यालयातील बी.एससी केमिस्ट्रीच्या एकूण दहा विद्यार्थ्यांची किनोमेरा बायोसायन्स कंपनीने निवड केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी दिली.
निवड झालेले विद्यार्थी लोंढे पंकज बाळासाहेब, गागरे योगेश मच्छिंद्र, निधाने सुयोग दिलीप, शेलार विशाल निवृत्ती, कदम गणेश अरुण, निर्मळ सुमित दीपक, कुमारी वाबळे स्वामिनी आप्पासाहेब, तमनर दत्तात्रय दिलीप, तांबे अभय एकनाथ, बनसोडे रामेश्वर सूर्यभान या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
सात्रळ महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्यू संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट डायरेक्टर डॉ. मनोज परजणे, किनोमेरा बायोसायन्सेस या नामांकित कंपनीचे मॅनेजर पाचारणे ज्ञानेश्वर, संस्थेचे शिक्षण संचालक व प्राचार्य डॉ. दिघे पी. एम., प्राचार्य प्रो. डॉ. पी. एम. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कॅम्पस इंटरव्यूसाठी उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. डी. एन. घोलप, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. वाघमारे ए. एस, महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट समितीच्या समन्वयक सौ. कार्ले सी. एस. यांनी परिश्रम घेतले. तसेच सदस्य प्रा. दिघे एस. जी., प्रा. कडू एस. पी., प्रा. कडू आर.बी., प्रा. दिप्ती आगरकर, प्रा तांबे पी. ए., प्रा. सोनाली मंतोडे, प्रा. क्षीरसागर जी. एस व तुपे एस. आर. यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button