ठळक बातम्या

चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिरसगाव ग्रामस्थांनी घेतली खा. लोखंडे यांची भेट

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शिरसगाव येथे गेल्या 10 दिवसांपासून रोजच ग्रामस्थांच्या घरी चोऱ्या व दगडफेक होत आहे. या होणाऱ्या प्रकारामुळे ग्रामस्थ घाबरून गेले आहे. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दाखल घ्यायला पाहिजे होती. परंतु तस काही दिसत नव्हते. याच कारणाने गावकरी रोज रात्री उशिरा रात्रीपर्यंत गस्त घालत आहेत, असे असूनही काही सत्र थांबायचे नाव घेत नाही. ग्रामस्थांच्या बोलण्या प्रमाणे अजून पर्यंत एकही चोरीचा तपास लागला नाही व त्यामुळे चोरांचे मनोबल अधिक उंचावले होते.
या सर्व गोष्टीला वैतागुन समस्त गावकरी यांनी आज खा.लोखंडे यांची घरी जाऊन भेट घेतली व निवेदन देऊन सर्व प्रकार सांगितला. सगळा प्रकार ऐकून खा.लोखंडे यांनी तात्काळ डीवायएसपी संदीप मिटके यांना संपर्क केला. तात्काळ हा सर्व प्रकार थांबला पाहिजे असं सांगितलं. त्यानंतर लगेच पोलीस प्रशासनाकडून हालचालींना वेग आला व डीवायएसपी मिटके, पोलीस निरीक्षक गवळी यांनी शिरसगाव येथे येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या व लवकरात लवकर हा प्रकार थांबेल अशी ग्वाही दिली. यानंतर सर्व ग्रामस्थांनी खा.लोखंडे यांचे आभार मानले. या निवेदनावर सरपंच आबासाहेब गवारे, गणेश मुदगुले, मा.सरपंच दिनकरराव यादव, सोसायटी चे चेअरमन किशोर बकाल यांच्या सह्या होत्या.
यावेळी शिवसेनेचे नेते राजेंद्र देवकर, बाबासाहेब कदम, छावा क्रांतिवीर सेना जिल्हाध्यक्ष रोहित यादव, जेष्ठ नेते सुनील ताके, बॉबी बकाल, ज्ञानदेव यादव, रविंद्र ताके, नाना यादव, महेन्द्र ताके, किरण ताके, शुभम ताके, उमेश ताके, विजय मराठे, पिनू गवारे, रवी यादव, विशाल निघुत, रफिक पठाण, साईनाथ सोनावणे, बंटी यादव, गणू चिकणे, ललित बिलवरे, दत्ता गवारे, राजू दिवे, योगेश दुशिंग, जय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button