अहमदनगर

महात्मा गांधी जयंती निमित्त वृक्षारोपण

राहुरी | जावेद शेख : नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथे जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी खातगाव येथील माजी सैनिक रावसाहेब कळमकर, किसनराव सातपुते, भाऊसाहेब सातपुते, संदीप कुलट‌, रावसाहेब कुलट, नारायण कुलट, रमेश वेताळ, काशिनाथ सातपुते, राजू ठुबे, बाळासाहेब कुलट, गणेश कुलट, बापू गायकवाड, भगवानराव कोल्हे, किरण कळमकर व जय हिंद फाउंडेशन चे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, महादेव शिरसाट, म्हातारदेव मुळे, बापू गायकवाड, भगवानराव कोल्हे, सुहास जपे, गणेश मस्के, संकेत कुलट, गोरख सातपुते, राजाराम मस्के, मेजर नामदेव कळमकर,  संजय सासवडे, विजय जपे आदि‌ उपस्थित होते.
महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न जय हिंद च्या माध्यमातून केला जात आहे. वृक्षारोपण काळाची गरज असून त्याचे संवर्धन करणे त्यापासून ऑक्सिजनचे प्रमाण पावसाचे प्रमाण वाढते व पर्यावरण संतुलित राहते म्हणून जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या वतीने खातगाव येथे 41 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले. खातगाव येथील स्मशानभूमी मध्ये ११ वडाची झाडे, चिंच, भेंडी, करंज अशी ४१ झाडांची लागवड करण्यात आली. ही सर्व झाडे खातगाव येथील आजी माजी सैनिक संस्था या झाडांचे पालन पोषण करणारा करणार आहेे, असे प्रतिपादन संदीप कुलट मेजर यांनी केलेे. आभार महादेव शिरसाट यांनी मानले.

Related Articles

Back to top button