अहमदनगर

नवरात्रोत्सवात महिलांनी आणली २३ किमी पायी प्रवास करून ज्योत

राहुरी शहर | अशोक मंडलिक : राहुरी खुर्द येथील महालक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळाने उत्सवा दरम्यान सातव्या माळेला नवीनच प्रथा सुरू करून राहुरी तालुक्याचे नाव गर्वाने उंचावण्याचे काम केलेले आहे. या मंडळाने महिलांच्या हस्ते ज्योत आणली. हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने व शांततेत पार पाडला.
या कार्यक्रमात राहुरी खुर्द येथील अनेक महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम कौतुकास्पद ठरला. या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सोनई ते राहुरी खुर्द असा 23 किलोमीटरचा प्रवास करत आंतर ज्योत पायी घेऊन आल्या आहेत. या वर्षी महिलांनी पायी ज्योत आणायची ही सर्वात चांगली अशी संकल्पना मंडळाच्या अध्यक्षा रंजना अशोक गरड यांनी मांडली होती. या कार्यात त्यांचे सुपुत्र मनोज अशोक गरड व मंडळाच्या उपाध्यक्षा व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या असलेल्या सौ. अश्विनी सुनील कुमावत यांनी लाखमोलाचे सहकार्य केलेे.
त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये कधी न झालेल्या अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सर्वात जास्त श्रेय हे महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षा रंजना अशोक गरड यांना जात आहे. त्यांचे चिरंजीव मनोज यांनी या कार्यक्रमाला चांगला हातभार लावल्याने व गावकऱ्यांच्या सहकार्याने शांततेने हा कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते व अन्य गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थिती लावली.

स्व. निर्मलाताई मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली हे ४२ वे वर्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची मुलगी आश्विनी कुमावत व त्यांचा मुलगा पप्पूशेठ मालपाणी यांनी आजही परंपरा चालू ठेवली आहे.

Related Articles

Back to top button