अहमदनगर

उंदीरगाव येथे व्यायामशाळा शुभारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : उंदीरगाव येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाटील पाऊलबुद्धे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी उपस्थित अशोक कारखान्याचे संचालक वीरेश गलांडे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब नाईक, लोकनियुक्त सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, प्रकाश ताके, पाराजी ताके, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब निपुंगे सदस्य ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते मनोज बोडखे, बाळासाहेब घोडे, पवन पाऊलबुद्धे, सागर गिऱ्हे, सुनील ताके, सचिन काशीद, दिलीप भालदंड, आगांद आढाव, संजय काळे, कादरभाई शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button