अहमदनगर

फुले दांम्पत्याचे विचार अंगीकरण्याची गरज-महाराष्ट्र भूषन लोकनेते गुलदगड

अहमदनगर – सावित्री-ज्योती महोत्सव २०२२ या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीमाई व महात्मा ज्योतिबा फुले दांम्पत्याचे विचार अंगिकारण्याची आज गरज असल्याचे मत महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी व्यक्त केले.
जय युवा ॲकॅडमी आयोजित सावित्री-ज्योती महोत्सव २०२२ नुकताच नगर शहरात कोहीनुर मंगल कार्यालय येथे जल्लोषात साजरा झाला. यामध्ये १२ तारखेच्या पहिल्या सत्रात भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस आयच्या राष्ट्रीय सह समन्वयक मंगलताई भुजबळ होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भुषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड, नेत्रदुत जालिंदर बोरुडे, स्त्री रोग तज्ञ डॅा.भास्कर रणनवरे, डॅा.शंकर शेडाळे, प्रसिद्ध व्याख्यात्या प्रा.स्वातीताई सुडके, डॅा. प्रमोद पालवे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर मोफत आरोग्य शिबीरात भव्य रक्तदान शिबीर, हिमेग्लोबीन तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी व मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबीरा बरोबरच लेक वाचवा लेक शिकवा अभियान तसेच मतदार जागृती नोंदणी व पर्यावरण जनजागृती चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जय युवा ॲकॅडमीचे अध्यक्ष ॲड महेशजी शिंदे व सचिव सौ.जयश्रीताई शिंदे यांच्या मुख्य संयोजनातुन नगर शहरात १० ॲाक्टोबर ते १४ ॲाक्टोबर सावित्री-ज्योती महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास नगर शहराबरोबरच जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे. सहसंयोजक पोपटराव बनकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर मनपा रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button