ठळक बातम्या

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांचे अनुदान द्या

काँग्रेसच्या वतीने राहाता तहसीलदार यांना निवेदन देताना डाॅ. एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात, श्रीकांत मापारी आदी…

राहाता : कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आ. सुधिर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहाता तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत व मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करणेबाबत राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल, परंतु या वर्षी संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, असे असताना राज्यातील ईडी सरकार साधे पंचनामेही करायलाही तयार नाहीत. आज शेतकऱ्यांना त्वरित मदतीची गरज आहे, मात्र राज्य सरकार केवळ टिव्हीवर दिसत आहे. या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ७५ हजार रुपये मदत द्यावी. मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे.
मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली असून, जगात १२१ देशांपैकी १०७ क्रमांकावर आपला देश आला आहे, हे अतिशय खेदजनक आहे. भारताची हि प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून आखण्यात यावे. शेती पिकांवर फवारल्या जाणाऱ्या किटकनाशके, औषधे व खतांवरील लावण्यात येणारा जी.एस.टी. काढून टाकण्यात यावा. केंद्र सरकारने सोयाबीन अन्य पिकांवरील निर्यातबंदी उठवण्यात येवून आयात बंद करावी व शेतकऱ्यांना फायदा होईल असे आयात निर्यात धोरण राबवावे. या मागण्यांचे निवेदन राहाता तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तहसिलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले.
जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष डाॅ. एकनाथ गोंदकर, शिर्डी विधानसभेचे नेते सुरेश थोरात, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्रीकांत मापारी, जिल्हा काँग्रेस चे सह सेक्रेटरी विक्रांत दंडवते, तालुकाध्यक्ष ॲड पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष आशोक कोते, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, महिला कॉंग्रेसच्या शितलताई लहारे, लताताई पारधे, तालुका असंघटीत कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष निर्मळ, राजेंद्र निर्मळ, तालुका कॉंग्रेसचे मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, असिफ इनामदार, मुन्नाभाई अब्दुल सय्यद, मुन्ना फिटर, शहनवाज मणियार, संजय जेजुरकर, सागर कोलगे, गणेश चोळके, बबन नळे, प्रवीण घोडेकर, संदिप कोकाटे, गुंजाळ, मारुती (मेजर) डांगे, अशोक पारधे, मधुकर बनसोडे, बाबासाहेब घोरपडे, बाळासाहेब पारधी, अमोल आरणे, शब्बीर शेख, असीम बेग, जाकीर शेख, अमीन पटेल, एकनाथ थोरात, सागर जेजुरकर, सोमनाथ जेजुरकर, रनजित आहेर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Related Articles

Back to top button