कृषी

मेरी पॉलिसी मेरे हाथ अंतर्गत बालानगर येथे पिक विमा पाठशाळा संपन्न

विलास लाटे | पैठण : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मेरे पॉलिसी मेरे हाथ अंतर्गत पैठण तालुक्यातील बालानगर या गावात पिक विमा पाठशाळेचे आयोजन एग्रीकल्चर इन्शुरन्स
कंपनीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी निसर्गाच्या लहरी पणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजना किती महत्त्वाची आहे. तसेच शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, तसेच वैयक्तिक नुकसान जर झाले तर क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये कशी तक्रार दाखल करावी याबाबत सविस्तर माहिती  एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे राम घेगडे यांनी दिली.
यावेळी आप्पासाहेब गोर्डे, बद्रीनाथ गोर्डे, गोरख नवले, बिस्मिल्ला सौदागर, अशोक गोर्डे, प्रल्हाद घोंगडे ,अरुण साळवे, बाबासाहेब घोंगडे, काकासाहेब घोंगडे, बाळू गोर्डे, सारंग ढाकणे, हनुमान घोंगडे, भास्कर गोर्डे कैलास वीर, पप्पु घोंगडेसह आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button