अहमदनगर

प्रसाद शुगर कारखान्याचा बॉयलर “अग्नीप्रदीपन” समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

राहुरी शहर | अशोक मंडलिक : प्रसाद शुगर वांबोरी कारखान्याचा सन २०२२- २३ च्या अकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कारखान्यातील कर्मचारी नितीन परसराम पागिरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री नितीन पागिरे या दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजन करून कारखान्याचे संचालक सुरेश बाफना यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर प्रज्वित करण्यात आला.
कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२२-२३ हा ‘विजय दशमीच्या’ शुभमुहूर्तावर प्रतिदिन ४५०० मे. टन या कार्यक्षमतेने गळीत हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी झालेली आहे. मशिनरी सुसज्ज आहे.  कारखान्याने अत्याधुनिक मशिनरी बसविलेली आहे. प्रतिदिनी ५००० मे. टन ऊस पुरवठा करणारी सक्षम ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती केलेली आहे. या गळीत हंगामाकरिता प्रसाद शुगर कारखान्याकडे दहा हजार हेक्टर उसाची नोंद झालेली असून या मधून अंदाजे ८ ते ९ लाख मे. टन उस उपलब्ध होणार आहे.
   ” गळीतास उभा असलेल्या उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना कटिबद्ध असून कारखान्याने कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्रा बाहेर अशी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे या गळीत हंगामात प्रसाद शुगर कारखान्याने ८.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गळीतासाठी उभा असलेला ऊस प्रसाद शुगर कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे.”
_ सुशिलकुमार देशमुख, कार्यकारी संचालक प्रसाद शुगर
 
यावर्षी नगर जिल्ह्यातील पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, म्हणून उन्हाळ्यात देखील शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करून त्याची प्रसाद शुगर कारखान्याकडे नोंद करण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केलेली आहे.
   ” प्रसाद शुगर ने ३० के. एल. पी. डी. क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प हाती घेतलेला आहे सदर प्रकल्पाचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले असून या गळीत हंगामात सदर प्रकल्प चालू केला जाणार आहे त्या अनुषंगाने शासनासोबत वीज खरेदी करार झालेला असून सहवीज निर्मिती प्रकल्पाचे कामास सुरुवात केलेली आहे.”
_ विकास आभाळे, सरव्यवस्थापक- प्रसाद शुगर
 
     या कार्यक्रम प्रसंगी पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच तोडणी व वाहतूक मुकादम, कारखान्याचे सरव्यवस्थापक विकास आभाळे, वर्क्स मॅनेजर संजय म्हस्के, उत्पादन विभागाचे प्रमुख अर्जुन माने, शेतकी अधिकारी सुदाम घुगरकर, डिस्टलरी मॅनेजर बाळासाहेब आढाव, केन अकाउंट महावीर खोत, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे स्थाई तपासणी अधिकारी शंकर बडाख, सुरक्षा अधकारी प्रवीण वाघमारे, अशोक चितळकर, शैलेंद्र काळे, आबासाहेब कल्हापुरे, महेश गायकवाड, गजानन पाटील, भरत तनपुरे, बबन पागिरे यांच्यासह सर्वविभगाचे खाते प्रमुख-उपखाते प्रमुख, तसेच सर्व कर्मचारीवृंद मोठया प्रमाणात उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button