अहमदनगर

लोणी खुर्द गावात श्री लोमेश्वर मंदिरात सुवर्ण महोत्सव

लोणी : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दि १७ ऑगस्ट पासुन प्रारंभ झाला असुन बुधवार दि २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन तद्नंतर महाप्रसादाने सांगता होईल. तरी या सप्ताह चा ग्रामस्थ व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोणी खुर्द सेवा संस्थेचे चेअरमन राजेंद्र आहेर यांनी केले.
सप्ताहाचा परामर्श सांगताना ते म्हणाले संपुर्ण देशात सन १९७२ ला मोठा दुष्काळ पडलेला होता अन्नधान्याचा ही मोठा तुटवडा असताना याच दुष्काळी वर्षी लोणी खुर्द येथील सरला बेट संस्थान चे तत्कालीन विश्वस्त भुमिपुत्र कै. आमदार चंद्रभान (दादा) घोगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महंत गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांनी योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह दिला होता. व तो त्याच्याच आशीर्वादाने पार ही पडला.
गुरुवर्य महंत नारायणगिरी महाराजांचा आशिर्वाद घेऊन दुष्काळ असतानाही गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर चारा तगाई चे कर्ज काढुन हा सप्ताह गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीने कै. आमदार चंद्रभान (दादा) घोगरे पाटील यांनी सरलाबेटाच्या त्यावेळच्या झालेल्या सप्ताहात आगळा वेगळा सप्ताह घडवुन आणला पुढे नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सप्ताहसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले चारा तगाई कर्ज ही शासनाने माफ केले. मात्र तेव्हापासून योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह चे स्वरुप बदलुन त्यास भव्यता प्राप्त झाल्याची सद्गुरु नारायणगिरी महाराज आपल्या किर्तनातुन कायम आठवण करुन गावाचे कौतुक केले. सन १९७२ ला गावातील पंचाहत्तर टक्के कुटुंबातील कर्ते पुरुष व्यसनाधीन झालेले होते परंतु झालेल्या सप्ताह च्या निमित्ताने सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्याकडून त्या ग्रामस्थांच्या तुलसी माळा गळ्यात टाकुन त्यांना व्यसनाधीनते पासून परावृत्त केले त्यानंतर गावात व्यसनाचे प्रमाण नगण्य झाले व त्या नागरिकांचे संसार प्रपंच उभे राहिले.
तेव्हापासून सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने लोणी खुर्द गावात दरवर्षीच श्रावण कृ ६ ते श्रावण कृ १२ या तिथी ला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला तेव्हापासून या सप्ताहच्या काल्याच्या कीर्तनाला तहायात सद्गुरु नारायणगिरी महाराज यांनी कधी खंड पडू दिला नाही व तीच परंपरा आजही सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनीही अव्याहत पणे ठेवली.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी लोणी खुर्द चे सरपंच श्री जनार्दन घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहभागातुन सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांनी सुरु केल्याला श्रावण कृ ६ बुध दि १७ ऑगस्ट ते श्रावण कृ १२ बुध दि २४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होत असुन त्यास यावर्षी ५० वर्ष झालेले असुन हा सप्ताह सुवर्ण महोत्सव म्हणून ग्रामस्थ साजरा करत आहे. दररोज काकडा, हरिपाठ, भजन, ज्ञानेश्वरी पारायण व दररोज संध्याकाळी कीर्तन व त्यानंतर दररोज महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे. तसेज दिनांक २४ ऑगस्ट रोजी सरला बेटाचे मठाधीपती महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन व तद्नंतर महाप्रसाद वाटप होऊन सप्ताहाची सांगता होईल. तरी सर्व भाविक व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा.

Related Articles

Back to top button