अहमदनगर

आजच्या जीवनात पवित्र रोझरी फार महत्वाची- फा. प्रमोद बोधक; हरिगाव मतमाउली यात्रापूर्व शेवटचा नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज शेवटच्या हरिगाव मतमाउली यात्रापूर्व नवव्या शनिवार नोव्हेना प्रसंगी हॉली फमिली चर्च कोपरगाव धर्मगुरू प्रमोद बोधक यांनी “पवित्र माळेचे रहस्य”या विषयावर प्रवचन करताना सांगितले की, आजच्या जीवनात पवित्र रोझरी ही फार महत्वाची आहे.
ते म्हणाले की पवित्र माळ कॅथोलीक धर्मामध्ये एकदम विशेष अशी माळ गणली जाते आणि प्रचलित अशी प्रार्थना आहे. या प्रार्थनेचा उगम झाला तर कशा प्रकारे झाला हे जर पाहिले तर रोझरी हा शब्द लाटिन भाषेत रोझारीओ या शब्दातून येतो तर आणि त्याचा मूळ अर्थ आहे गुलाबाची बाग, आता या रोझरीचे रुपांतर कशामुळे झाले व ही माळ कशी उदयास आली त्याची अनेक उदाहरणे आहेत. एक उदाहरण म्हणजे जर पवित्र मरीयेनेसंत डॉमनिकला दर्शन दिले व त्यावेळी सांगितले की, १५० वेळा तो स्तोत्र सहिता हे बोल मग त्याने मठ उभे केले आणि त्या मठांव्दारे १५० वेळा स्तोत्र बोलण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्या रोझरीचा उदय झाला. त्यानंतर परमगुरु संत पायस यांनी अनेक प्रार्थना एकत्र केल्या आणि आता आपण जी रोझरी बोलतो ती उदयास आली. नंतर १९१७ या वर्षी पवित्र मारीयेने फातिमा या गावी जाऊन सांगितले की, रोझरी तुम्ही जे पापी लोक आहेत संसाराच्या उद्धारासाठी तुम्ही पवित्र माळ बोला, जेणेकरून जे पापी लोक आहेत ते चांगल्या मार्गाला लागतील आणि मग ही रोझरी एक सशक्त रोझरी बोलली व ती सर्व लोकांची एक आश्रयदाती बनली.
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो रोझरी या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आहे आणि जेंव्हा आपण पवित्र माळ बोलतो त्यामध्ये अनेक प्रकारची रहस्ये असतात. आनंदाचे गौरवाचे या रहस्याव्दारे प्रभू येशू ख्रीस्ताच्या जीवनावरती चिंतन करतो आणि संत सांगत आहेत की रोझरीच्या मार्फत आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आपण मनन चिंतन करतो. आज कित्येक लोक रोझरीच्या व्दारे आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणीत आहेत आणि जर आपल्याला आजच्या जीवनात पवित्र बनायचे असेल तर रोझरी ही आपल्या कुटुंबामध्ये आज असणे खूप गरजेचे आहे. कारण या या रोझरीव्दारे पवित्र मरीयेची मध्यस्थी करतो व त्या मध्यस्थीव्दारे आपण आपल्या प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताकडे पोहोचवत असतो.
आज अनेक तरुण तरुणी चुकीच्या मार्गाला जात आहेत तर त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही पवित्र मरीयेची मध्यस्थी करा, रोझरीची प्रार्थना तुम्ही स्वीकारा. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये देखील बदल घडवून येईल म्हणून आज पवित्र माळेचे रहस्य साजरा करत असताना या रोझरीव्दारे पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊ या…
या शनिवारी अशोकनगर येथून पदयात्रेने भाविक आले होते. प्रारंभी मतमाउली मूर्तीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. नोव्हेना प्रसंगी अशोकनगर येथील धर्मगुरू मुक्तीप्रसाद, हरिगाव चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारीओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी सहभागी झाले होते. येत्या बुधवारी ३१ ओगस्ट रोजी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांच्या हस्ते मतमाउली यात्रा शुभारंभ ध्वजारोहणाने उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button