अहमदनगर

स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या नेवासा अध्यक्षपदी गडाख तर सोनई शहराध्यक्ष पदी बारगळ यांची निवड

अहमदनगर/ जावेद शेख : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना अंतर्गत असलेल्या स्वराज्य पोलीस मित्र संघटना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने नेवासा तालुका व सोनई शाखेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि संघटना संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कार्य करत आहे.
श्री क्षेत्र शनी शिंगणापूर रोड सोनई येथील दरंदले पाटील ट्रेडर्स येथील एका हॉल मध्ये मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. सुुरुवातीला सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख भरतजी नजन, महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष जावळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सचिन चांदघोडे, जिल्हा सरचिटणीस समीरभाई शेख, राहुरी तालुकाध्यक्ष गणेश हिंगे, राहुरी तालुका सदस्य रमेश आघाव, निलेश आघाव, महेश पटारे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख संतोष आहेर यांनी नेवासा तालुका व सोनई शहर कार्यकारिणी जाहीर करुन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले. यामध्ये नेवासा तालुकाध्यक्ष पदी संभाजी गडाख, तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ कर्जुले, संपर्क प्रमुख विकास पवार, तालुका सहसचिव रमेश पंडित, तालुका सदस्य निलेश उकिर्डे, चांगदेव ठोंबरे, योगेश पडुळे, संभाजी कचरे, किरण शिर्के तर सोनई शहराध्यक्ष पदी रघुनाथ बारगळ, उपाध्यक्ष कारभारी गव्हाणे, संपर्क प्रमुख सुरेश ओहळ, शहर संघटक अनिल बारवेकर, सचिव सुभाष ढाले, सहसचिव संभाजी ढाले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गवते आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख संतोष आहेर व जिल्हा सरचिटणीस समीरभाई शेख यांनी परिश्रम घेतले. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button