शिक्षणवारी ज्ञान पंढरी

बाल विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेशभूषा स्पर्धेने उत्साहात साजरा

राहुरी : येथील बाल विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यामंदिर शाळेत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत महोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे शिक्षीका रूपाली पवार, सविता जगताप, जयश्री पाटोळे, तसेच संदीप रासकर यांनी केले. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे काम विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांची उपस्थिति दाखवून केले, त्यामुळे पालकांचेही आभार शाळेच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा. रा. एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मनोजशेठ बिहानी, कै. ला. रां. विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक कैलास अनाप, बाल विद्यामंदिर चे मुख्याध्यापक गुलाब मोरे, पत्रकार शिवाजी दवणे, प्रशांत जोशी, दत्तात्रय जगधनी, श्रीमती अलका आढाव, सविता साखरे, सुनीता शेटे, नंदा काळे, नानासाहेब पवार, सुनिता बारसे, बाळासाहेब राठोड, दत्तात्रय हेंद्रे, कवडे शिवाजी, मीना बर्डे, कल्पना जोजारी, संदीप जंगम आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button