ठळक बातम्या

किसान पुत्र आंदोलनाची भूमिका राजकीय मंचावर आणणार – क्रांतिसेना

बीडकिसान पुत्र आंदोलनाची भूमिका रास्त असून देशातील दारिद्र्य आणि बेरोजगारी संपविण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत ही भूमिका अखिल भारतीय क्रांती सेनेच्या माध्यमातून राजकीय पटलावर आणण्याचा प्रयत्न आगामी चिंतन शिबिरात होणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील यांनी केले आहे. बीड येथील बैठकीत हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते आणि शेतकरी चळवळीचे नेते अमर हबीब यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला. आगामी काळात पक्षीय पातळीवर शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी क्रांतिसेना संघर्ष करेल. यावेळी किसान पुत्र आंदोलनाचे अमृत महाजन, अनिरुद्ध चौसाळकर, कालिदास अपेट, ॲड. एकलव्य पोतदार हे उपस्थित होते तर अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाचे अध्यक्ष संतोष तांबे, सरचिटणीस भाई नितीन देशमुख, साईनाथ कासोळे, लक्ष्मण शेलार हे चर्चेत सहभागी झाले होते.
    चिंतन शिबिरातील हा असेल प्रमुख अजेंडा :
  • कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग)‌.
  • आवश्यक वस्तू कायदा.
  • जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे व परिशिष्ट-9 रद्द करणे.
भारतातील जातीय तेढ, धार्मिक आगपाखड, बेरोजगारी, दारिद्र्य हे सर्व प्रश्न एकाच वेळी सुटून समृद्ध अर्थ व्यवस्थेसाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत आणि त्यासाठी राजकीय मंचावर एक व्यापक चळवळ उभारण्यासाठी अखिल भारतीय क्रांतिसेना पक्ष हा विषय अजेंडा म्हणून राबवले आणि त्यासाठी राज्यभर चिंतन शिबिर घेण्यात येतील. त्यातील पहिले चिंतन शिबीर औरंगाबाद येथे लवकरच घेण्यात येईल, असे यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे सरचिटणीस नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button