अहमदनगर

मुळा धरणावर पूल बांधण्यासाठी प्रयत्न करणार- आ. तनपुरे

वावरथ येथे कोट्यवधी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ 

राहुरी / बाळकृष्ण भोसले – अतिदुर्गम व मुळा धरणाच्या बेटावर वसलेल्या वावरथ-जांभळी परिसरामध्ये पहिला वीजेचा प्रकाश माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या काळात झळकला. माझ्या आमदारकीच्या काळात वीज रोहित्रांसह सबस्टेशनच्या माध्यमातून परिसरातील ग्रामस्थांचा वीज प्रश्न कायमचा संपूष्टात येत असल्याचे मोठे समाधान आहे. तनपुरे कुटुंबिय व वावरथ-जांभळीकरांचे अतूट नाते जोपासत असताना परिसरातील ग्रामस्थांना प्रवाहात आणण्यासाठी धरणावरील पूल बांधणीसाठी आमदारकी पणाला लावू असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील वावरथ येथे १ कोटी ७५ लक्ष रूपये विकास निधीच्या माध्यमातून घर घर नळ योजना व ११ हजार वृक्षरोपणासह रस्ते, शाळा आादी विविध विकास कामांचा शुभारंभ आ. तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे हे होते. याप्रसंगी आ. तनपुरे यांनी सांगितले की, राहुरी, पाथडी व नगर मतदार संघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून विकास कामांबाबत कोणतीही कसूर सोडली नाही. मागिल १५ वर्षात राहुरी मतदार संघाचा विकास खुंटलेला असल्याने अनेक कामे प्रलंबित होते. त्यांची सोडवणूक करताना मंत्रालयात मोठा अनुभव लाभला आहे. सहा खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळताना राज्यातील प्रश्नांची सोडवणूक केली. त्यामुळे माझ्या मतदार संघातील प्रश्न कसे सोडवायचे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे कोणी कितीही वावड्या उठवल्या तरी विकास कामांबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही. अतिदुर्गम असलेल्या वावरथ, जांभळी परिसरामध्ये वीज, पाणी व रस्त्यांच्या कामांना भरीव निधी दिला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहोत. वावरथ ग्रामपंचायतीने ११ हजार वृक्षारोपणाचा घेतलेला निर्णय व वृक्ष जगविण्यासाठी केलेले नियोजन हे आदर्श ठरणार आहेत.

अडीच वर्ष राज्यमंत्रीपदाचा काळात मुळा धरणाच्या पूल प्रश्नाची सोडवूण करण्यात मोठे यश आले होते. परंतु अचानक सत्ता बदल झाल्याने पूल मंजुरीला थोडासा विलंब लागणार आहे. १९ लक्ष रूपये खर्च करून पूल सर्व्हेक्षण झालेले आहे. जलसंपदा व बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूल बांधणी करू. राहुरी- बारागाव नांदूर -वावरथ- ढवळपूरी या गावांच्या रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा लाभला आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपये निधी उपलब्ध होऊन रस्त्यांचे प्रश्न संपूष्टात येणार आहे. राहुरी मतदार संघातील एकही प्रश्न प्रलंबित राहू नये यासाठी आमदारकी पणाला लावू परंतु विकास कामे थांबू देणार नाही असे आश्वासन आ. तनपुरे यांनी दिले.

याप्रंगी वावरथचे सरपंच ज्ञानदेव बाचकर यांनी परिसरात आ. तनपुरे यांच्या माध्यमातून झालेले कोट्यवधी रूपयांचे विकास कामांचे वाचन केले. तनपुरे कुटुंबियांनी वावरथ-जांभळी ग्रामस्थांशी जपलेले नाते हे ग्रामस्थ कदापी विसरणार नाही असे बाचकर यांनी सांगितले. माजी सभापती आण्णा सोडनर व नवाजभाई देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेकडो आदिवासी कुटुबियांना प्रत्येकी दोन हजार रूपये किंमतीची किराणा खाऊटी किट वाटप करण्यात आली. तसेच ग्रामस्थांना नूतन व दुबार केलेल्या शिधापत्रिकांसह दाखले वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वावरथचे उपसरपंच गंगाराम दुधवडे, जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, पाटीलनाना बाचकर, आबासाहेब काळनोर, श्रीकांत बाचकर, सम्राट लांडगे, विजय बाचकर, धोंडीराम बाचकर, रावसाहेब केदार, भागवत पवार, आण्णासाहेब बाचकर, सखाराम बाचरक, सिद्धार्थ जाधव, दगडू बाचकर, चंद्रकांत कदम, दामू जाधव, बाळू मधे, गोपीनाथ दुधवडे, हरीभाऊ जाधव, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संदिप बाचकर, वनविभागाचे अधिकारी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेवक योगेश चंद यांनी मानले.

रस्ता व पूल बांधणी झाल्यास परिसरातील गावांचा कायापालट होणार
    मुळा धरणावरील पूल बांधणी झाल्यास पुणे व मुंबई येथे प्रवास करणार्‍यांना मोठा लाभ होणार आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ कमी होऊन ४० ते ५० किमीचा अंतर कमी होणार आहे. त्यामुळे पूल बांधणी होऊन जिल्हा मार्गावरील रस्ते बांधण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा सुरूच राहणार आहे. लगतच्या गावांचा कायापालट होऊन विकास कामांना मोठे पाठबळ लाभणार असल्याने आपले प्रयत्न कमी पडणार नाही असे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button