अहमदनगर

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व पाचवा शनिवार नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : संत तेरेजा चर्च हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे पाचव्या शनिवारी नोव्हेनाप्रसंगी भक्तिमय वातावरणात फा सायमन शिणगारे यांनी पवित्र मारीयेच्या जीवनाचे महत्व वर्णन केले. नोव्हेनाप्रसंगी संगमनेर येथील प्रमुख धर्मगुरू सायमन शिणगारे म्हणाले की प्रत्येक वर्षी पावसाला सुरु झाला की नगर जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होते व मतमाउली यात्रासाठी तयारीत राहायचे असते.सर्व एकमेकांना विचारतात की मतमाउली यात्रा कधी आहे? आपण हरिगाव भक्तीस्थानात प्रवेश करतो तेंव्हा आपल्या कमानीवर जे वाक्य असते ते म्हणजे”जे माझ्या पुत्राचा सन्मान करीन त्याच्या इच्छा मी पूर्ण करीन”जे माझा सन्मान करीन त्याच्या इच्छा मी पूर्ण करीन”म्हणूनच आम्ही पवित्र मारीयेचा सन्मान करतो.कारण की तिने देवाचा सन्मान केला व त्यानुसार देव तिच्या इच्छा पूर्ण करतो.देव तिच्या बरोबर सतत राहिला आमचा प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे देवत्व तिने जगासमोर आणले.कारण तीचे देवत्व प्रकट केले कारण ती देवपुत्राची माता होती.त्याची माता असल्याने प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या इच्छा पूर्ण करीत आपल्या जीवनामध्ये आम्हा सर्वांना साधू संतांची परंपरा लाभलेली आहे.ते सर्व सामान्य होते.त्यांनी आपल्या जीवनामध्ये गौरव केला देवाने त्यांचा गौरव केला.त्यामुळे ते देवमय झाले.तसा विश्वास आशा,आणि प्रीती अनन्य आहे,श्रेष्ठ आहे. परंतु प्रितीच ही सर्वश्रेष्ठ आहे. संत सुद्धा श्रेष्ठ आहेत परंतु पवित्र मरिया ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण तिने आम्हा सर्वांच्या इतिहासाप्रमाणे परमेश्वराशी तिने सामाईकता केली. परमेश्वराच्या इच्छेला तिने मान दिला म्हणूनच जेंव्हा पवित्र मारिया म्हणते की जे माझ्या पुत्राचा सन्मान करतील त्याच्या इच्छा मी पूर्ण करीन.जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे म्हणून पवित्र मरीयेने देवाच्या वचनाप्रमाणे तिने आपले जीवन आचरणात केले म्हणून ती देवपुत्राची माता बनली म्हणून या देवपुत्राच्या मातेचा महिमा आम्ही गातो कारण की तिच्या पुत्राला आम्ही देवपुत्र मानतो.तो देवपुत्रच नाहीतर आम्हाला तारणारा व मुक्तिदाता आहे.त्याने आपल्या मरणाने व क्रुसावर जाण्याने व पुनररुथाने त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन आम्हाला मिळवून दिले.त्यानंतर त्याने आम्हासाठी त्याचे शरीर व रक्त दररोज खाण्यासाठी,पिण्यासाठी दिले.म्हणून पवित्र मरीयेने जिवंत देवाचा स्वीकार केला.आपल्या उदारमध्ये तिने देवाचे संगोपन केले व शेवटपर्यंत तिने आईची भूमिका उचितपणे निभावली. त्यावेळी सर्वांची व शिष्यांची काळजी घेतली. म्हणूनच १५ ऑगस्ट रोजी पवित्र मरीयेच्या स्वर्गरोह्णाचा दिवस साजरा करीत असतो. या दिवशी आम्हाला विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मारीयेला सदेह स्वर्गात घेतले व ती फक्त त्याची माता राहिली नाही तर ती स्वर्गाची राणी झाली. पवित्र मरीयेचे कार्य या भूतलावर व स्वर्गामध्ये चालू आहे.म्हणून तिचा सन्मान आम्ही आपल्या जीवनात केला तर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा सन्मान होईल.याच आशेने या भक्तीस्थानात लाखो भाविक पवित्र मरीयेची भक्ती करण्यासाठी येतात.म्हणून तिचे गुणगान गायले पाहिजे. जेणे करून आमचे जीवन या सृष्टीवरती आम्ही घालवू शकू.. या नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे,रिचर्ड अंतोनी सहभागी होते.येत्या १४ ऑगस्ट रोजी फा सचिन मुन्तोडे नोव्हेनाप्रसंगी प्रवचन करणार आहेत.शासकीय आदेश पाळून सर्व कार्यक्रमाचा लाभ घरबसल्या प्रसार माध्यमांद्वारे भाविक घेत आहेत.

Related Articles

Back to top button