अहमदनगर

बारावीच्या परीक्षेत शिरसगाव येथील न्यू.इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

श्रीरामपुर / बाबासाहेब चेडे : खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थांच्या न्यू. इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, शिरसगाव या महाविद्यालयाचा इ. 12 वीचा 100 टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयात अनुक्रमे कु.वाघ उर्मिला गोरख 535 गुण 89.17% , कु. उंडे कोमल सुभाष 483 गुण 80.50%, कु. त्रिभुवन अनिता 476 गुण 79.33% गुण मिळवून हे विद्यार्थी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 

   या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन पुष्पलताताई आदिक, अध्यक्ष डॉ. बबनराव आदिक, सहसचिव जयंतभाऊ चौधरी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, गव्हर्निग काउन्सिल सदस्य हंसराज आदिक, प्राचार्य  जयकर मगर,पर्यवेक्षक  भास्कर ताके यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रा. संतोष दांडगे, प्रा. राजन वधवाणी, प्रा. सुनीता आहिरे, प्रा. मंगल शिरसाठ आणि प्रा. प्रतिभा दुधाट यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. ऑनलाईन निकाल तयार करुन बोर्डाच्या वेबसाइटवर टाकण्यासाठी प्रा. संतोष दांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले..

Related Articles

Back to top button