अहमदनगर

शिव संपर्क अभियान उंबरे गावात संपन्न

राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख शिव संपर्क अभियान २०२१ अंतर्गत वांबोरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती उंबरे गणात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. महाविकास आघाडीने जे लोकहिताचे निर्णय घेतलेले आहे ते जनतेला कळावे व हंगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गावागावात जाऊन व घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना पोहचवण्याचे कार्य यामाध्यमातून सुरू केले आहे. मुख्यमंंत्र्यांनी केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या संपर्क अभियानाची सुरुवात राहुरी तालुक्यातील उंबरे गावामध्ये करण्यात आली आहे. शिव संपर्क कार्यक्रम शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला, यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भागवत मुंगसे,पाथर्डी तालुका प्रमुख रफिक शेख, नेवासा हरिभाऊ शेळके, राहुरी उपतालुका प्रमुख दीपक पंडित, चेअरमन विलास ढोकणे,उपतालुकाप्रमुख कैलास अडसुरे, भगवान जाधव, विष्णू घुमे, नंदू गिरी, सतीश पंडित, अक्षय ढोकणे, सागर पंडित, रावसाहेब तांबे, आप्पा खेवरे, शंकर तरोडे, आनंद थोरात, अनिकेत जाधव, सुरेश काचोळे, लक्ष्मण पटारे, कारभारी ढोकणे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button