अहमदनगर

गुरुपौर्णिमा निमित्त लोणी व नेवासा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

राहुरी/ राजेंद्र आढाव : गुरुपौर्णिमा निमित्ताने लोणी व नेवासा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची महिती गुरुवर्य मंहत ह.भ.प.उध्दवजी महाराज मंडलिक यांनी दिली आहे.
     कोरोनाचे नियम पाळून गुरुपौर्णिमा निर्मित वरदविनायक सेवधाम, लोणी,ता. राहता येथे शुक्रवार दि.२३ जुलै रोजी सकाळी ९ वा. गुरूपादुका पूजन, मंदिर परिसरात दिंडी प्रदक्षिणा, सकाळी १० वा. प्रवचन व महाप्रसाद श्री वरदविनायक सेवधाम परिवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे. महाप्रसादाने कार्यक्रमची सागत होईल. दुपारी ३ वा. श्रीक्षेत्र नेवासा येथे सद्गुरू प्रतिष्ठान सद्गुरू मूर्तीचे पूजन,दुपारी ४ वा.प्रवचन व नेवासा पंचायत समिती वरिष्ठ सेवा निवृत्त साहाय्यक आर. एल. नाचन यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वा.तुकाराम महाराज मंदिर नेवासा येथे  जगतगुरु तुकाराम महाराज व वै. एकनाथ स्वामी महाराज यांचे पूजन व महाआरती होईल.तरी या कार्यक्रमास सद्गुरू प्रतिष्ठान व भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुरुवर्य मंहत उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button