अहमदनगर
मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाची हजेरी, मुळा धरण ४४ टक्के भरले
राहुरी प्रतिनिधी : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात (गुरुवार २२ जुलै) रोजी सायंकाळी पाण्याचा साठा ११ हजार ३८६ दशलक्ष घनफूट झाला आहे .धरणाकडे १० हजार ३४२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरण ११३८६ ( ४४टक्के ) भरले आहे .मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते .अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळण्याची मदत झाली आहे. मुळा धरण आवक लक्षात घेता यंदा मुळा धरण १००% भरण्याची चिन्हे आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पाण्याच्या पातळी कडे वेधले आहेत. मुळा धरणात गेल्यावर्षीचा दोन हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा अतिरिक्त होता त्यामुळे यंदा मुळा धरण १००% भरण्याची चिन्हे शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
” मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण असून मुळा धरण ४४ टक्के भरले आहे. कोतुळ येथे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.”
अण्णासाहेब आंधळे ( धरण शाखा अभियंता )