कृषी

आरोग्यवर्धक काळा गहू

भाऊसाहेब येवले : शास्त्रज्ञाच म्हणणं असं आहे की, हा अँटीऑक्सिडेंटयुक्त गहू हृदय रोग, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो. काळ्या रंगांच्या गव्हात झिंकबरोबरच बायोफोर्टिफाइड असते. याशिवाय हा गहू कुपोषणाच्या विरोधात हत्यार म्हणून वापर करता येतो. अशाच प्रकारे जांभळा रंगाचा गहू मधुमेही रुग्णांसाठी लाभकारी आहे.

     शास्त्रज्ञाचा हा प्रयोग आता एनएबीआयच्या लॅब आणि संस्थेच्या 35 एकर क्षेत्रापुरता मर्यादीत राहिला नाही तर देशातल्या पाच राज्यातील सुमारे 700 एकर क्षेत्रात रंगीत गव्हाच्या पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मध्य प्रदेशात 80 एकर, पंजाबमध्ये 210 एकर, उत्तर प्रदेश मध्ये 150 एकर, हरियानामध्ये 65 एकर आणि बिहार राज्यात 10 एकरमध्ये हे रंगीत गव्हाचे पीक  घेतले जात आहे. गेल्या वर्षी 80 एकर क्षेत्रात हे पीक यशस्वी रित्या घेतले गेले आहे. त्यामुळे या गव्हाच्या जातींचा हळूहळू प्रसार आणि वाढ होत आहे. आणखी काही वर्षांत या गव्हाच्या जाती संपूर्ण देशात पिकवल्या जातील.
     आपल्या देशात आयुर्वेदाला अलीकडच्या काही वर्षांत फारच महत्त्व आहे. विविध रोगांसाठी आयुर्वेद औषध वापरले जात आहे. उपयुक्त फळांचा रस आपल्याला आता प्रक्रिया करून बाटलीबंद स्वरूपात मिळत आहे. पण आता आपल्याला यासाठी दवाखान्यात जाण्याची गरज नाही. कारण आता या गव्हामुळे बिस्किटे, चपात्या,रोट्या खायला मिळणार आहेत. देशातल्या इतर राज्याच्या कृषी विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्यांचा विस्तार करायला हवा. औषधी गुणांच्या या गव्हाच्या जातींचा प्रसार झाल्यास लोकांच्या आरोग्यास त्याचा आणखी उपयोग होण्यास मदत होईल.
काळा गहू  मिळण्यासाठी संपर्क:
ट्राय फार्म  राहुरी
मोबाईल नंबर 94 22 22 55 11

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button