ठळक बातम्या

विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची क्रांतीसेनेची राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मागणी

पैठण:आज संपूर्ण भारत देश कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने त्रस्त आहे. अनेकांचे हाताचे कामे गेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे अनेक कामगार बेरोजगार झालेत. हेच काम करणारे विद्यार्थी ज्यांना आज काम नाहीत त्यांचे शैक्षणिक नुकसान केवळ शैक्षणिक शुल्क भरायला पैसे नसल्या कारणाने होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५०% सवलत देण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे पक्षाध्यक्ष मा. संतोष पाटील तांबे यांच्या वतीने माननीय कुलगुरू तथा राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या कडे करण्यात आली. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक हे खऱ्या अर्थाने बहिस्त विद्यार्थ्यांसाठी ज्ञान गंगोत्रीच आहे. परिस्थितीमुळे नियमित शिक्षण न घेऊ शकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य विद्यापीठ करत आहे. मात्र यावर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने या हजारो काम करणाऱ्या विद्यार्थांचे हाताचे काम गेली आहेत. तेव्हा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची संपूर्ण फीस भरणे अनेकांना अशक्य झाले असून त्यांचा शैक्षणिक खंड पडण्याची शक्यता वाढली आहे. म्हणून अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाच्या वतीने आदरणीय श्री.भगतसिंग कोश्यारी माननीय कुलगुरू तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या कडे चालू शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय आणि विद्यापीठास मिळत असलेली फीस मध्ये ५०% कमी करावे, फीस अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button