ठळक बातम्या

क्रांतीसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

राहुरी:प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांना विनाकारण त्रास देवुन बदनाम केले जात आहे.अशा घटनेमुळे समाजावर विपरीत परिणाम होऊन समाजामध्ये भविष्यात समाज सुधारक निर्माण होतील का नाही,याची शंका आहे. म्हणुन समाजाने इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी उभे राहण्याची काळाची गरज आहे.या उद्देशाने आज अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या शिष्टमंडळाने इंदोरीकर महाराजांची भेट घेत या घटनेचा निषेध करत पाठींबा दिला.
      निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मागील जवळपास २५ वर्षापासून राज्यात प्रबोधनाची चळवळ चालविली आहे.आज पर्यंत त्यांनी लाखो कीर्तन केले आहे.त्यांचे कीर्तन नुसतेच आध्यात्मिक नसुन त्या माध्यमातून त्यांनी हुंडाबळी,शेती,समाज परिवर्तन, दारूबंदी, भ्रष्टाचार, बालविवाह, अंधश्रद्धा, बुवाबाजी यासह अनेक अनिष्ट रूढी,परंपरा व चालीरीती इत्यादींवर मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले आहे.त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील तरूण पिढी जि कधीच कीर्तन अथवा अध्यात्माकडे वळत नव्हती ,ती तरुण पिढी,अबाल वृध्द आज त्यांच्या प्रबोधनामुळे अध्यात्माकडे डोळसपणे बघत आहे.त्यांच्या कीर्तनामुळे आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण समाजात परिवर्तन घडवून आले आहे.निवृत्ती महाराज इंदोरीकर हे नुसतेच कीर्तनातून प्रबोधन करत नसुन ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण संस्था ही चालवतात.त्याच बरोबर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणुन वारकरी शिक्षण संस्था ही चालवतात.तसेच गोशाला ही त्यांनी सुरू केल्या आहेत.वरील सर्व बाबींचा विचार करून निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील,ग्रामीण भागातील शेतकर्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठीचे योगदान अनन्य साधारण आहे.त्यामुळे समाजाने खर्या अर्थाने त्यांच्या पाठीशी आज उभे राहणे गरजेचे आहे.
     यासाठी आज अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नवनाथ ढगे, युवक जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते, राहुरी युवक तालुकाध्यक्ष श्याम कदम आदींच्या शिष्टमंडळाने इंदोरीकर महाराजांची भेट घेत त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल सत्कार करत जाहीर पाठिंबा दिला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button