अहमदनगर

मतदार कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा; अर्ज क्रं. ६ व ६ ब भरण्याचे आवाहन

अहमदनगर – मतदार कार्ड आधारकार्डशी जोडण्याची मोहिम ०१ ऑगस्ट, २०२२ पासुन सुरु होणार आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे.
मतदार कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी ६ क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार असून हा अर्ज ऑनलाईन व ऑफ लाईन अशा दोन्ही पध्दतीने भरता येणार आहे. नवीन मतदार नोंदणी करतांना अर्ज क्रमांक ६ भरावा लागणार असून त्यासाठी एक रंगीत छायाचित्र, (पासपोर्ट साईज ४.५ से.मी. ३.५ से.मी. पाठीमागील भाग सफेद रंगामध्ये), जन्म तारखेचा पुरावा म्हणून पुढील पैकी एक जोडणे आवश्यक आहे.
महानगरपालिका प्राधिकरणाने किंवा जन्म व मृत्यु कार्यालयाने निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सीबीएसई, आयसीएसई तसेच राज्य शिक्षा बोर्डव्दारा दिलेले दहावी किंवा बारावीचे गुणपत्रिकेवर जन्म दिनांक नमुद केलेले प्रमाणपत्र, भारतीय पासपोर्ट, तसेच रहीवास पुरावा म्हणुन पुढील पैकी एक जोड़णे आवश्यक आहे. पाणीपटटी किंवा घरपटटी बील, लाईट बील, गॅस कनेक्शन (कमीत कमी एक वर्षापुढील), आधार कार्ड, सध्याचे बँक / पोष्ट खात्याचे पास बुक, भारतीय पासपोर्ट, महसुल विभागाचे जमीन मालकीचे रेकॉर्ड, रजिस्टर भाडेपटटा, रजिस्टर विक्री परवाना, तर जुन्या मतदारांना अर्ज क्र.६ ब भरावा लागणार आहे. त्यासाठी आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. ज्यांना ऑफ लाईन अर्ज भरावयाचा आहे, त्यांच्या साठी अर्ज क्र.६ हा स्थानिक पातळीवरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांचे कार्यालयात उपलब्ध असणार आहे. मतदार कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी मतदारांनी त्यांचे आधारकार्ड मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांचेकडेस जमा करावे. तसेच हा अर्ज सीईओइलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेत स्थळावर उपलब्ध असणार आहे. ज्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. त्यांच्यासाठी तेथेच माहिती भरून अर्ज पाठविण्याची सुविधा असणार आहे.
मतदार कार्ड आधारकार्डशी जोडणे ऐच्छिक असले तरी प्रत्येकाने मतदार कार्ड आधारकार्डशी लिंक करावे असे. आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा अहमदनगर तहसिलदार उमेश पाटील व निवडणूक नायब तहसिलदार माधव गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Related Articles

Back to top button