अहमदनगर

सुगी फौंडेशनच्या वतीने धरतीआबा बिरसा मुंडा, लहुजी वस्ताद साळवे यांची संयुक्त जयंती साजरी

अहमदनगर/ जावेद शेख : दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संत गाडगे बाबा आश्रमशाळा या ठिकाणी सुगी फौंडेशन अहमदनगर यांच्या वतीने आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा व क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा व आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा लहुजी (वस्ताद) साळवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नामा साठे, प्रा. भास्कर बुलाखे, पापाभाई बीवाल, संजयजी संसारे, निलेश जगधने, कादरभाई शेख, ईजाज पीरजादे, आश्रम शाळेतील अधीक्षक गोळे सर, सुगी फौंडेशनचे अध्यक्ष संदीप कोकाटे इत्यादी विविध सामाजिक क्षेत्रात काम करत संघर्ष करत असलेले मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन नामा साठे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय जातीव्यवस्था असलेल्या देशांमध्ये राहुरी शहरात संत गाडगे बाबा आश्रमशाळेमध्ये आपण बिरसा मुंडा व लहुजी वस्ताद साळवे यांची संयुक्त जयंती साजरा करत असताना महाराष्ट्रातील जनतेला संदेश देत आहोत की हे दोन क्रांतिकारक यांचा लढा यांचा इतिहासाचा वारसा घेऊन आपण सर्वांनी पुढे जाऊन नवीन पिढी तयार करून क्रांतिकारक सामाजिक परिवर्तन करणारे नेतृत्व तयार करणे अपेक्षित आहे असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मत व्यक्त केलं.
प्रा. भास्कर बुलाखे यांनी आदिवासी संस्कृती व समानतेचा लढा बिरसा मुंडा यांनी कसा चालवला याबद्दल मनोगत व्यक्त करुन लहुजी वस्ताद साळवे यांनी शिक्षण व रक्षण कशाप्रकारे केले पाहिजे, याची सांगड घालून मनोगत व्यक्त केले. तसेच संदीप कोकाटे यांनी बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन, हक्क अधिकारासाठी उलगुलान कसा पुकारला, उलगुलान म्हणजे काय याबाबतीत मनोगत व्यक्त केले व त्याचाच उलगुलान राहुरी शहरातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये आपण संयुक्त जयंती साजरा करून भविष्यात नवीन पिढी तयार करणे व समाज परिवर्तन करण्याचे काम आज आपण या संयुक्त जयंतीच्या माध्यमातून करत आहोत. याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले.तसेच लहुजी साळवे यांनी आपली तालीम मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना दिली व भविष्यातील स्त्रीमुक्ती साठी शिक्षणाच्या माध्यमातून खूप मोठे क्रांतिकारक काम केले. अशाप्रकारे वर्तमान काळात सुगी फौंडेशन शिक्षण, बेरोजगार ,शेती, मजूर असंघटित विविध वंचित क्षेत्रातील समूहासाठी काम करत राहणार आहे तरच आपण धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जल जंगल जमीन समानतेचा कृतिशील वारसा घेऊन पुढे जात राहणार आहे, असे सविस्तर मनोगतामध्ये संयुक्त जयंती निमित्त मत व्यक्त केले.
यावेळी संजय संसारे, पापाभाई बीवाल, ईजाज पिरजादे यांनीही सकारात्मक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे आभार निलेश जगधने यांनी मानले.

Related Articles

Back to top button