अहमदनगर

दिवाळी सणाच्या वाढीव सुट्टया जाहीर करा-अमोल चंदनशिवे

शिक्षक भारती संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
राहुरी विद्यापीठ/ वृत्तसेवा/जावेद शेख :
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालकांच्या सुधारित आदेशाप्रमाणे दिवाळी सणाच्या दिलेल्या वाढीव सुट्ट्या जाहीर कराव्यात या संदर्भात शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांच्यावतीने माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षकांना कोरोनाच्या काळात खूप सुट्टी आहे असे समाजाचे, अधिकाऱ्यांमध्ये मत तयार झाले आहे. परंतु नवीन शैक्षणीक वर्षा आरंभ जून पासूनच शिक्षक विद्यालयात जाऊन ग्रामीण भागात प्रत्यक्ष अध्यापनाचे काम करत आहे व शहरी भागात प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयात जाऊन ऑनलाइन अध्यापन करत आहे. परंतु दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) परीक्षेमुळे सदरील सुट्ट्या कमी करण्यात आल्या. परंतु शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या दि. 3 नोव्हेंबर 2021 रोजी च्या परिपत्रकानुसार सुट्ट्या परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळ व उन्हाळी सुट्टीमध्ये स्थानिक स्तरावर समायोजित कराव्यात असे आदेशित केले.
त्या अनुषंगाने कोल्हापूर विभाग, नाशिक विभाग, भंडारा, हिंगोली अशा विविध जिल्ह्यात शिक्षणाधिकारी यांनी पत्रक काढून सुट्या जाहीर केल्या आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यात अद्याप त्याबाबत पत्र न काढल्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुधारित आदेशान्वये वाढीव सुट्ट्या जाहीर कराव्यात यासाठी अहमदनगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस महेश पाडेकर यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले.
या निवेदनास उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, रामराव काळे, रूपाली बोरुडे, अमोल चंदनशिवे, मफीज इनामदार, सचिन जासूद, सचिन लगड, अमोल वरपे, सल्लागार कैलास राहणे, कैलास जाधव, हनुमंत रायकर संतोष शेंदुरकर, संजय पवार, विजय कराळेे, बाबासाहेब लोंढे आदींनी पाठिंबा दिला.

Related Articles

Back to top button