ठळक बातम्या
जिल्हा रुग्णालयातील सहा जनाचे निलंबन; तपास पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे वर्ग
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री यांनी मोठा निर्णय घेतला असून जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह एकूण सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. या संबंधातील माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पोखरणा यांचे निलंबन करू नका त्यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
हे झाले निलंबित…जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी, डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी, सपना पठारे- स्टाफ नर्स, आस्मा शेख -स्टाफ नर्स सेवा समाप्त, चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त…
जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर विभाग ( अतिरिक्त कार्यभार –अहमदनगर शहर विभाग ) यांचे कडे वर्ग केला आहे.
घटनास्थळी अद्यापपावेतो केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, आपत्ती व्यस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे, पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर, अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, खासदार सुजय विखे, सदाशिव लोखंडे, आमदार निलम गोऱ्हे, संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, सत्यजित तांबे, लहू कानडे, रोहित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरणा, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, महावितरण सचिव व कमिटी विभागीय आयुक्त कमिटी आदींनी भेटी दिल्या आहेत.
पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके हे करीत आहेत.