अहमदनगर

देवळाली प्रवरात महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पाच एक्कर ऊस जळाला

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र विठ्ठल ढुस यांचा इनामवस्ती जवळील पाच एक्कर ऊस विजेच्या तारांचे शाँर्टसर्कीट होवून लागलेल्या आगित जळून मोठे नुकसान झाले आहे. माञ महावितरणाने या आगि बाबत हात झटकले आहे.
सोमवारी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान ऊसाच्या शेतावरुन गेलेल्या विज वाहक तारा एकमेकांना घासल्याने आगिचे लोळ उसाच्या शेतात पडल्याने ऊसाच्या पाचरटाने पेट घेतला पहाता पहाता पाच एकरात आग पसरली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतू अग्निशमन गाडी घालण्यासाठी जागा नसल्याने आग विझवता आली नाही. देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, राहुरी येथिल अग्निशमनबंब दाखल झाले होते. जुना गणेगाव रस्त्याच्या बाजुने पेटलेला ऊस विझवण्यात अग्निशमन यंञणेला यश आले. दुसऱ्या बाजुने गाडी जाण्यास रस्ता नसल्याने त्या भागातील ऊस पेटला गेला.
घटनास्थळी परीसरातील शेतकरी उपस्थित झाले त्यांनी आग विझवण्याचा भरपुर प्रयत्न केला. परंतू वारा सुटल्याने आग वाढतच गेली. पाच एक्कर ऊस आगित सापडला. उसाचा क्षेञावरुन महावितरणाच्या विज वाहक तारा गेल्या असुन त्या तारांना मोठ्या प्रमाणात झोळ पडला असल्याने विज वाहक तारा एकमेकांना घासुन विजेच्या ठिणग्या पडत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. माञ याबाबत महावितरणाने हातवर केले आहेत. फटाक्यामुळे आग लागली असेल असा जावई शोध लावला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button